Sunday , July 26 2026
Breaking News

इस्कॉनतर्फे सात दिवसांचा भागवत गीता अभ्यास वर्ग

Spread the love

 

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने फेब्रुवारी महिन्यात मराठी, कन्नड व इंग्रजी या तीन भाषांत सात दिवसाचा भागवत गीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे.
दि.11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर, टिळकवाडी येथे रोज सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत होणाऱ्या या अभ्यासवर्गात भगवद्गीता काय आहे, सुखाचा शोध आणि मानवी जीवनाचे महत्त्व, भगवंत कोण आहेत, मी कोण आहे, आत्मा काय आहे, पुनर्जन्म ही कल्पना आहे की वास्तविकता, चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते, सर्वोत्तम योग कोणता आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचा उपयोग काय? या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुकांनी 90355 30030 किंवा 7264001247 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *