
येळ्ळूर : नवहिंद महिला प्रबोधन संघातर्फे हळदी- कुंकू व महिला मेळावा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा सौ. नीता नारायण जाधव या होत्या. सुरुवातीला महिलांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक सौ. प्रगती पाटील व परिचय सौ. नम्रता पाटील यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख वक्त्या डॉक्टर स्नेहल गोरल व सौ. हेमलता पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन सौ. लक्ष्मी मासेकर अध्यक्षा ग्रामपंचायत येळ्ळूर व मथुरा तेरसे अध्यक्षा ग्रामपंचायत उचगाव, वर्षा टक्केकर व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख वक्त्या डॉ. स्नेहल गोरल यांनी उपवर वयातील मुलींच्या समस्या व त्यावरील उपाय, स्त्रियांच्यात चाळीसीनंतर होणारे बदल व उपचार तसेच मुलींना सक्षम करण्यासाठी पालकांची जबाबदारी यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी सौ. लक्ष्मी मासेकर व सौ. मथुरा तेरसे यांनीही स्त्रियांच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात सौ. निता जाधव यांनी हळदीकुंकूचे महत्त्व सांगून स्त्रियांनी सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे, असे विचार मांडले. याप्रसंगी सौ. स्नेहल गोरल, वर्षा टक्केकर, मथुरा तेरसे, हेमलता पाटील, स्नेहल गोरे यांनी भरीव अशी देणगी दिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून “शिवकन्या शाहिरी कलामंच येळ्ळूर” हा बहरदार असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन सौ. माधुरी पाटील, शितल बस्तवाडकर, सुरेखा सायनेकर, सुलभा पाटील, सुनीता कणबरकर, शीला पाटील, राजश्री दनकारे, पूजा कंग्राळकर, रेखा पाटील, शालन कुगजी, जयश्री देसुरकर, नयन उघाडे, हिरा कुंडेकर, स्नेहल गोरे, वर्षा अष्टेकर, सरिता जाधव, पल्लवी जाधव, स्वाती पाटील, रेखा पाटील, अनिता जाधव, वंदना कदम, शारदा मुरकुटे या संघाच्या सदस्या व गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सौ. शुभांगी पाटील व आभार सौ. रूपा धामणेकर यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta