
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक आज सोमवार दि. 03/02/2025 रोजी सायंकाळी 8.00 वा विभाग कार्यालयात संपन्न झाली. यावेळी मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला व मागील जी येळ्ळूर विभाग म. ए. समिती कार्यकारिणी 2018/19 मध्ये तयार झाली होती. त्या कमिटीचा कार्यकाळ 5 वर्षाचा होता तो मागील वर्षी संपुष्टात आला होता तेंव्हापासून नवीन कमिटी करण्यासाठी चाचपणी चालू होती. आजच्या बैठकीमध्ये पूर्वीच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली, असा ठराव या बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्ष शांताराम कुगजी हे होते व पुढील बैठकीमध्ये सल्लागार समिती नेमून पुढील कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे. तरी गावातील जेष्ठ व युवा समितिनिष्ठ नेते कार्यकर्ते, तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींनी पुढील बैठकीमध्ये उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील बैठक गुरुवार दि. 07/02/2025 राजी होणार असून सर्वांनी उपस्थिती राहण्यासाठी येळ्ळूर विभाग म. ए. समिती आवाहन केले आहे. यावेळी अध्यक्ष शांताराम कुगजी, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, विलास घाडी, वाय. सी. इंगळे, परशराम घाडी, ग्राम पंचायत सदस्य, सदस्या, माजी ग्राम पंचायत सदस्य, जेष्ठ नेते व समितिनिष्ठ, शेकडो युवा कार्यकर्ते, उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta