
संजीवीनी फौंडेशनतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
बेळगुंदी : प्रत्येक स्त्रीने आरोग्यपूर्ण राहण्यासाठी आहार व्यायाम आणि आध्यात्म यांची सांगड घालावी असे विचार डॉ. सुरेखा पोटे यांनी केले. रथसप्तमी दिनाचे औचित्य साधून बेळगुंदी येथील पृथ्वीराज काजू फॅक्टरी येथे संजीवीनी फौंडेशनतर्फे आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या सुरेखा शरद पाटील, प्राजक्ता प्रसाद घोडके, संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि संचालिका रेखा बामणे उपस्थित होत्या.
प्रत्येक स्त्री ही कुटुंबाची काळजी करीत असताना स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करीत असते म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते त्यामुळे प्रत्येकीने मानसिक शारीरिक आध्यात्मिक समतोल बाळगून आपल्याला कोणतेही आजार होऊ नयेत याकडे लक्ष द्यावे असेही डॉ. पोटे यांनी सांगितले.
यानंतर उपस्थित महिलांनी आरोग्यविषयी अनेक प्रश्न विचारले त्यांच्या शंकांचं निरसन डॉ. पोटे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत करताना डॉ. सविता देगीनाळ यांनी दरवर्षी आम्ही हळदीकुंकू कार्यक्रम हा आमच्या परिसरात घेत असतो पण यावर्षी ग्रामीण भागातील महिलांसोबत करण्याचा विचार करून आम्ही तुमच्या गावात आलो असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्या सुरेखा पाटील व घोडके यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यानंतर प्रत्येक स्त्रीने उखाणे घेतले. शेवटी उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून वाण देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना शीरहट्टी, पुष्पा भेंडवाड, मिताली कुकडोळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा औशेकर यांनी तर गौरी कलदुर्गी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta