Tuesday , December 9 2025
Breaking News

पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा स्पोर्ट्स क्लबला जनरल चॅम्पियन

Spread the love

 

बेळगाव : गोवावेस कॉर्पोरेशन जलतरण तलावात आबा हिंद स्पोर्ट्स व क्रीडा भारती यांच्यावतीने घेतण्यात आलेल्या दुसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून 929 गुण वसूल करून जनरल चॅम्पियनशिप मिळविली तर स्वीमर्स क्लब 612 गुण घेऊन द्वितीय स्थानावरती राहिला. दुसऱ्या दिवशी झालेल्या चुरशीच्या जलतरण स्पर्धेत 15 नवीन स्पर्धा विक्रमांची नोंद झाली. या स्पर्धेत ग्रुप एक मध्ये स्वरूप धनुचे याने 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये 24.88 सेकंदाचा विक्रम केला तर तनुज सिंग याने 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये 1 मिनिट 06.84 सेकंदाचा आश्चर्यचकित करणारा विक्रम केला.
या स्पर्धेतील वैयक्तिक विजेते पुरुष गट- स्मरण मंगळूरकर, स्वरूप धनुचे, सार्थक श्रेयकर, मोहित काकतकर, भगतसिंग गावडे, हर्षवर्धन कर्लेकर, महिला गट सुनिधी हलकरे, वेदा खानोलकर, निधी कुलकर्णी, आरोही चित्रगार, स्वरा कलखामकर, पाकी हलगेकर, दर्शिका निटटूरकर यांनी आपापल्या गटातील वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळविली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट मोहीम सोशल स्पोर्ट्स क्लबचे डायरेक्टर श्री राजेंद्र मुंदडा, जायंट्स क्लबचे माजी अध्यक्ष श्री. अनंत जांगळे, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी श्री. लक्ष्मणराव पवार, क्रीडा भरतीचे कर्नाटक राज्य सचिव श्री. अशोक शिंत्रे, आबा क्लबचे अध्यक्ष श्री. शितल हुलबत्ते, उपाध्यक्ष श्री. राजू गडकरी व स्पर्धा संयोजक श्री. विश्वास पवार यांच्या हस्ते जलतरणपटूंना प्रशस्तीपत्र, मेडल्स, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा क्लबचे अध्यक्ष श्री. शितल हुलबत्ते, राजू गडकरी, सुनील हनमनावर, विश्वास पवार, अमित जाधव, संदीप मोहिते, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, मारुती घाडी सुधीर धामणकर, वैभव खानोलकर, सुनील जाधव, हरीश मुचंडी, सतीश धनुचे, अभिषेक केस्टिकर, राहुल काकतकर, रामकृष्ण सर, सौ. शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, विजया शिरसाठ, शितल जाधव, स्नेहल धामणकर, गौरी जुवळी, एकता सिंग, हर्षाली पाटील, गौरी बेळगोजी, कलाप्पा पाटील, विशाल वेसने, चंद्रकांत बेळगोजी, भरत पाटील, विजय नाईक, विजय भोगन, किशोर पाटील, निखिल भेकने, प्रांजल सुलधाळ, ओम घाडी, ओंकार लोहार, यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *