Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव भा.वि.प.चा रौप्य महोत्सव रविवारी

Spread the love

बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखेचा रौप्य महोत्सव येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
मंडोळी रोड, द्वारकानगर टिळकवाडी येथील स्काय पार्कच्या गॅलेक्सी हॉलमध्ये हा रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे.
सोहळ्याच्या रविवारी सकाळी 10 वाजता होणाऱ्या उद्घघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भा.वि.प.चे प्रादेशिक सचिव पांडुरंग नायक, उत्तर कर्नाटक प्रांत अध्यक्ष पुरूषोत्तमदास इनानी आणि प्रांत सचिव स्वाती घोडेकर उपस्थित राहणार आहेत. उद्घघाटन समारंभानंतर दुपारच्या सत्रात देणगीदार तसेच विविध शाळा -कॉलेजेसचे मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सत्कार केला जाणार आहे.
दायित्व ग्रहण समारंभ रविवारी सायंकाळी 5 वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रोहन जुवळी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विनायक घोडेकर, मालतेश पाटील आणि रामचंद्र तिगडी हे भारत विकास परिषद बेळगाव शाखेचे अनुक्रमे नूतन अध्यक्ष, सचिव आणि अर्थ सचिव म्हणून दायित्व ग्रहण करतील.
या समारंभानंतर सांस्कृतिक -मनोरंजनाचे कार्यक्रम होऊन रात्रीच्या भोजनाने रौप्यमहोत्सवी सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्याची नोंदणी प्रक्रिया रविवारी सकाळी 8 वाजता सुरू होणार असल्याचे अध्यक्ष सुहास सांगलीकर, सचिव योगिता हिरेमठ आणि अर्थसचिव कुबेर गणेशवाडी यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *