
येळ्ळूर : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात सोसायटी च्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. विद्या रा. पाटील होत्या.
सौ. वीणा स. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सोसायटीच्या व्यवस्थापिका सौ. लक्ष्मी मा. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालिका सौ. मनीषा दि. घाडी, रेणुका प्र. मेणसे, रुपाली ब. कुगजी, राजश्री चां. कर्लेकर, राणी म. जाधव व श्रद्धा पां. निलजकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लक्ष्मीपूजन मनीषा ग. उघाडे यांनी केले, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रतिमेचे पुजन राजश्री कृ. चिट्टी यांनी केले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन रेखा र. घाडी यांनी केले. प्रमुख वक्त्या म्हणुन रूपा श्री. धामणेकर व उज्ज्वला सु. माणकोजी उपस्थित होत्या. त्यांनी हळदीकुंकू चे महत्व आणि परंपरेबद्दल माहिती दिली. यावेळी इतर विविध विषयांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला अश्विनी अ. गोरल, मंदाकिनी क. हुंदरे, नम्रता स.पाटील, वर्षा ना. धामणेकर, काजल मेलगे, अनिता देसाई, प्रियांका पाटील व गावातील विविध गल्ली मधील महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मिनल कानशीडे यांनी केले व पूनम पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta