
बेळगाव : येळ्ळूर येथील युनियन बँकेसमोरील शिवसेना चौकात कलमेश्वर गल्ली कॉर्नर वर असलेला धोकादायक ट्रान्सफॉर्मर तात्काळ अन्यत्र सुरक्षित जागी हटविण्यात यावा, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर शाखा आणि स्थानिक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली येळ्ळूर ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीच्या निवेदन आज सोमवारी सकाळी ग्रामीण उपविभाग -1 हेस्कॉम, गांधीनगर बेळगावच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आले. येळ्ळूर येथील युनियन बँक समोर शिवसेना चौक, कलमेश्वर गल्ली कॉर्नर वरील होडाफोन 25 केव्ही ट्रान्सफॉर्मर (टीसी) दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. या टीसीच्या बाजूला मंडळचा फलक आहे असून टीसीखाली थांबून युवक, मुले गप्पा मारत असतात. याखेरीज येथे दुचाकी वाहने पार्क करण्याबरोबरच टीसी शेजारी लहान मुले खेळत असतात. सदर जुना, जीर्ण झालेला टीसी कोणत्याही क्षणी धोकादायक बनण्याची शक्यता असून कुणाचा जीव घेईल सांगता येत नाही. याव्यतिरिक्त सदर टीसी रस्त्यावर असल्यामुळे रहदारीस देखील अडथळा होत असतो. तरी या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन धोकादायक बनत चाललेला सदर ट्रान्सफॉर्मर तात्काळ तेथून हटवून अन्यत्र सुरक्षित जागी बसवण्यात यावा जेणेकरून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल अशा आशयाचा निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर ग्रा.पं. सदस्य मेणसे यांच्या समवेत शुभम जाधव, सौरभ जाधव, चेतन देवलतकर, आकाश कुगजी, विपुल जाधव, सौरभ कुगजी, जयंत पाटील, गणेश कुगजी, मंथन खादरवाडकर आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta