
कावळेवाडी : पुस्तक वाचल्याने नकळत आपलं आयुष्य घडत जाते. कथा सादर करताना, स्वतः अभिनय करणं आवश्यक आहे. शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करावे. शब्दफेक चढउतार, भाव- भावना मनात रुजलेली हवी. ऐकणाराच्या हृदयात भिडायला हवं विद्यार्थीदशेत धिटपणे बोलण्याची बिज पेरायला हवे साने गुरुजी होऊन जिवंतपणा आणायला हवा. शिवाजी महाराज बनून इतिहास जागा करायला हवा सजीव होण्यासाठी पाठांतर करायला हवे. अतिशय उत्कृष्ट कथा सादर केल्या विषय ज्ञान छान एकंदरीत परिणामकारक मनाला भिडणारे विवेचन होते अशा शब्दांत शंकर चौगले यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कथा कथन कार्यक्रमात ते बोलत होते. बिजगर्णी हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. महात्मा फुले व महात्मा गांधी फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले
उपस्थित मान्यवरांचे सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
माध्यमिक गटात..
प्रथम क्रमांक कु.सरोजा शिंदे, कुद्रेमणी हायस्कूल, द्वितीय क्रमांक.. निकीता अष्टेकर. बिजगर्णी हायस्कूल, तृतीय क्रमांक..श्रीनाथ जाधव. बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी,
प्राथमिक गटात.. प्रथम क्रमांक .. भूमी भातकांडे. बालिका आदर्श बेळगाव, द्वितीय क्रमांक कु.वैभवी मोरे, बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, तृतीय क्रमांक सोनम पाटील, बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, उत्तेजनार्थ आरव गावडा, बेळगुंदी, स्वरा पाटील बेळगुंदी.
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र रोख रक्कम सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत शाळा व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे कौतुक केल्याने आत्मविश्वास निर्माण होतो भविष्यात जीवन जगण्यासाठी बळ मिळते वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हे उपक्रम राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहेत असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश पाटील, उद्घाटक प्रशांत बिर्जे, बिजगर्णी हायस्कूलचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव, मराठा बँक संचालक अशोक कांबळे, शंकर चौगले, वाय एच. पाटील, ए एल. निलजकर, रमेश कांबळे, शिवाजी शिंदे, प्रा. महादेव खोत, प्रा. पी व्ही नाकाडी, के आर भास्कर, कोमल गावडे, सूरज कणबरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत दोन्ही गटात चाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पालक, विद्यार्थी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन भाग्यश्री कदम, दीपा मोरे यांनी केले. आभार तेजस्विनी कांबळे यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta