
बेळगाव : देशाचं नेतृत्व क्रीडा मैदानावर तयार होत असते त्यासाठी प्रत्येकाने क्रीडा मैदानावर परिश्रम घेतले पाहिजेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये नैसर्गिक क्रीडा गुण उपजत असतात त्याचा विकास करणे महत्त्वाचे असते. बक्षीसे पदके मिळवण्यापेक्षा स्वतःला सदृढ ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. क्रीडा सरावाबरोबरच योगा अंगीकृत करा असे उद्गार संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एलआयसीचे सल्लागार श्री. मनोहर होनगेकर म्हणाले की, खेळाप्रमाणेच अभ्यासावरही लक्ष केंद्रित करा श्रमामुळे आम्हाला पुढे जाण्याची चालना मिळते. एकमेकाबरोबर सामना करण्यापेक्षा स्वतःशीच सामना करा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर यांनी केले, ध्वज स्तंभाचे पूजन शाळेचा माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते झाले तर ध्वजारोहण श्री. मनोहर होनगेकर यांच्या हस्ते झाले, क्रीडा साहित्याचे पूजन उद्योजक जयवंत पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सुरेख पथसंचलन केले व शाळेची विद्यार्थिनी भक्ती मेलगे हिने विद्यार्थ्यांना शपथ दिली. लक्ष्मी इंडस्ट्रीजचे मालक श्री. महादेव करडे यांनी क्रीडा ज्योत स्वीकारून स्वागत केले.
यावेळी संस्थेचे सचिव श्री. प्रसाद मजुकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संचालक नरेंद्र मजूकर, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एल. एस. बांडगे यांनी केले तर आभार श्री. वाय. बी. कंग्राळकर यांनी मांडले. क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले यांच्यासह हायर प्रायमरी स्कूल आणि हायस्कूलचा सर्व शिक्षक वर्ग यांनी सहकार्य केले.

Belgaum Varta Belgaum Varta