
बेळगाव : मिरज माहेर मंडळाची फेब्रुवारीची मासिक बैठक विप्र वैभव, आदर्श नगर येथे स्मिता सरवीर यांच्या निवासस्थानी पार पडली. आयुर्वेदिक डाॅ. कौमुदी पाटील यांचे साठीनंतर महिलांनी आपली काळजी कशी घ्यावी, आयुर्वेदिक उपचार कसे करुन घ्यावेत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रारंभी खजिनदार सुखद देशपांडे यांनी मिरज माहेर मंडळाची माहिती सांगितली. अध्यक्ष अस्मिता आळतेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून देऊन त्यांचे स्वागत केले. समारोपात सेक्रेटरी दिपा बापट यांनी आभार मानले.
आयुर्वेदात शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य ठीक असेल तरच ती व्यक्ती निरोगी असे सांगितले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृती नुसारच आहार विहार घेतला तर ती निरोगी राहते. त्यासाठी त्या व्यक्तीने आपली प्रकृती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजकालच्या काळात डायबेटिस, बी.पी., थायराॅईड, ओबॅसिटी, हे आजार टाळता येणे आणि त्याचबरोबर अलोपेथी औषधांचे दुष्परिणाम टाळता येणे हे आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म चिकित्सेद्वारे शक्य होऊ शकते.सध्या मानसिक स्वास्थ्यासाठी मेडीटेशन हे खुपच गरजेचे आहे, असे डाॅ. कौमुदी पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. महिलांच्या प्रश्नांवर समर्पक ऊत्तरे देऊन त्यांनी शंकानिरसन केले. आयुर्वेदिक उपचारांचे महत्व समजावून सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta