बेळगाव : शहरातील सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायोनियर अर्बन बँकेने नुकताच १०० कोटी रूपयांचा ठेवींचा टप्पा पार केला आहे.
आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवींचा १०० कोटी रूपयांचा टप्पा पार केल्याबद्दल चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी श्री. अष्टेकर यानी यापूर्वीच हा टप्पा गाठायला हवा होता असे सांगून आगामी काळात बँकेतर्फे ग्राहकांच्या सोईसाठी विविध सुविधा प्राप्त दिल्या जाणार असून त्याचा फायदा बँकेच्या प्रगतीसाठी होईल असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी व्हा. चेअरमन रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील, रमेश शिंदे, गजानन पाटील, सुहास तराळ, विद्याधर कुरणे, मारूती शिगीहळ्ळी, गजानन ठोकणेकर, रवी दोड्डण्णवर, लक्ष्मी कानूरकर व सी. ई. ओ. अनिता मुल्या उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta