
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषय शिक्षक विशाल पाटील उपस्थित होते. यावेळी इयत्ता दुसरी ‘क’च्या वर्गशिक्षिका शैला पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, उस्मान शेख यांच्या भूमिकेत विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे गाणे सादर केले. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर वेगवेगळे प्रसंग सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्यातील एक संवादही सादर केला. शिवाजी महाराजांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले.१८६९ साली म. जोतिबा फुले यांनी झाडा-झुडपात, पालापाचोळ्यात हरवलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्यांनी समाधी स्वच्छ केली आणि त्यावर फुलं वाहिली.शिवजयंतीची सुरुवात जोतिबा फुले यांनी केली. पुण्यात आणि रायगडावर जोतिरावांनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. महात्मा फुले यांनी समाजातील वंचित वर्गासाठी जे कार्य केले, त्यात शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्या लढाईच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व होते. अशाच संदर्भात विद्यार्थ्यांनी जोतिबा फुले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेत विद्यार्थी आले होते.
जाणता राजा, रयतेचा राजा,स्रियांप्रती आदर एकूणच शिवाजी महाराजांच्या जीवनप्रसंगांची मांडणी प्रमुख पाहुणे विशाल पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. याच दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये बालवाडी विभागात पालकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन, इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटन स्पर्धा, पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. याचवेळी शाळेतील शिक्षक बी. जी. पाटील यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या पत्राचे अनावरणही करण्यात आले.या स्पर्धेतील विजयी पालकांचे व विद्यार्थ्यांचे पुस्तक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत व सांस्कृतिक विभाग प्रमुख शैला पाटील व स्नेहल पोटे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शैला पाटील यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta