
बिजगर्णी : शिवचरित्र वाचा. इतिहास जाणून घ्या. गडकिल्ले अनुभवा. हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. इतर धर्माचा राजांनी द्रोह केला नाही उलट स्त्रीशक्ती चा सन्मान केला. स्वबळावर रयतेचे राजे झाले. अठरा पगड जातीला सामावून घेऊन राज्य उभारले हा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनानी इतिहास समजून घ्यावा
सीमाभागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धनासाठी या महाविद्यालयाची स्थापना केली आहे.तिलारी धरणातून गोवा राज्यात जाणारे पाणी, मागे वळवून बेळगाव पश्चिम भागात आणून शेतीसाठी वापर केला जावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे बेळगावच्या जनतेशी आमचे जवळचे त्रुणांनुबंध आहेत
या श्रमसंस्कार शिबिरातून ते दृढ होत आहेत त्याचं समाधान वाटले अशा शब्दांत त्यांनी मौलिक विचार व्यक्त केले
नरसिंगराव पाटील महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शिवरायांच्या प्रतिमेचे राजेश पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचेअध्यक्ष यल्लापा बेळगावकर होते
छ.शिवाजी महाराज यांचे चरित्र व जीवनकार्य या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन प्रा. डॉ. एम. एम. मतवल्ली यांनी केले. शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाची ओळख आपल्या ओघवत्या वाणीतून प्रकट केली.
या प्रसंगी राजेश पाटील यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेत असलेले प्राचार्य सौ.शीतल देसाई, कार्यक्रम अधिकारी एन. एन. एस. विभाग प्रा. पी. व्ही. नाकाडी यांचाही सन्मान करण्यात आला
व्यासपीठावर माजी आमदार राजेश पाटील, यल्लापा बेळगावकर, पुंडलिक जाधव, रेखा नाईक, अशोक कांबळे, जोतिबा मोरे, केदारी कणबरकर, रघुनाथ मोरे, तेजस्विनी कांबळे, वृत्तपत्र वितरकचे राजा भोसले, मोतिलाल जाधव, लक्ष्मण जाधव, संतोष कांबळे, हर्षवर्धन काळसेकर, आदी मान्यवर उपस्थित होते
प्रास्ताविक वाय पी नाईक यांनी केले, आभार उपाध्यक्ष ऍड. नामदेव मोरे यांनी मानले.
शिनोळी गावचे सरपंच परशराम पाटील, सुरेश भास्कर, प्रभाकर जाधव उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta