बेळगाव : समाजसेवक (सेंट पाॅल स्कूलचे माजी विद्यार्थी) तसेच हॉटेल व्यावसायिक असणारे किरण यल्लाप्पा निप्पाणीकर यांचे गुरुवारी (27 फेब्रुवारी) प्रयागराज (उत्तर प्रदेश #महाकुंभमेळा) येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. जुनी मोठी झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्यासाठी पहिला प्रयोग किरण निप्पाणीकर यांनी पिरनवाडी येथील नव्याने निर्माण केलेल्या तलावाच्या काठावर केला. वन खात्याच्या सहकार्याने एकूण 74 झाडांचे पुनर्रोपण त्यांनी केले.
काही दिवसांतच त्या झाडांना पालवी फुटली आणि प्रयोग यशस्वी झाला. कलंडलेली झाडे, परसात नको असलेली, विकासकामात अडथळा ठरणारी झाडे न तोडता ती मुळासकट खोदून दुसरीकडे लावण्याचा प्रयोग सुरु ठेवला. निप्पाणीकर यांनी आतापर्यंत 75 झाडांना जीवदान दिले होते. त्यांच्या कार्यात त्यांचा मित्रपरिवाराने मोलाची मदत करत आहेत. ते महापालिका अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांचे भाऊ आहेत.