Tuesday , March 3 2026
Breaking News

युवतीची निर्घृण हत्या करून प्रियकराची आत्महत्या….

Spread the love

 

बेळगाव : शहापूर नाथ पै चौक शहापूर येथील एका घरात एका युवतीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची निर्घृण घटना आज संध्याकाळी घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, येळ्ळूर येथील प्रशांत कुंडेकर नामक तरूण हा नाथ पै चौक येथील ऐश्वर्या लोहार (वय १८) या युवतीवर प्रेम करत होता. सदर युवतीने लग्नास नकार दिल्याच्या कारणाने तरुणाने आधी युवतीवर चाकूने हल्ला करून ठार केले. नंतर स्वतःला मारून घेतले यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचून पुढील तपास करत आहेत. पोलीस आयुक्तही घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी हजर झाले आहेत. सदर घटनेमुळे शहापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *