येळ्ळूर : क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवहिंद क्रीडा केंद्राच्या केंद्राचे संस्थापक सदस्य श्री. नारायण गोरे यांची अध्यक्षपदी तर सेक्रेटरीपदी श्री. आनंद पाटील यांची निवड नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष श्री. शिवाजी सायनेकर होते.
प्रारंभी सेक्रेटरी श्री. आनंद पाटील यांनी स्वागत करून वार्षिक अहवालाचे वाचन केले, उपाध्यक्ष श्री. प्रताप पाटील यांनी जमखर्चाचा तपशील सादर केला.
याप्रसंगी वर्षभरातील विविध कार्यासंबधी चर्चा करण्यात आली. नवहिंद आंतरराज्य सोसायटीचे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर, सी. बी. पाटील, उदय जाधव, अनिल हुंदरे, आनंद मजुकर इत्यादिनी नूतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.
2025 सालासाठी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे,
अध्यक्ष – नारायण गोरे
उपाध्यक्ष – नारायण बस्तवाडकर
सेक्रेटरी – आनंद पाटील
उपसेक्रेटरी – प्रताप पाटील
खजीनदार – प्रमोद जाधव
क्रीडा प्रमुख – सुधीर माणकोजी
जनसंपर्क अधिकारी – हणमंत पाटील
सदस्य – श्रीधर धामणेकर
सदस्य – बाळू दणकारे
यावेळी नवहिंद सोसायटीचे संचालक मंडळ, न्यू नवहिंद
सोसायटीचे संचालक मंडळ आणि नवहिंदक्रीडा केंद्राचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी श्री. हणमंत पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta