Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर शिवारात गवताची गंजी आगीत भस्मसात

Spread the love

 

बेळगाव : शनिवार दि. ८ रोजी संध्याकाळी ६.३० ते ७ दरम्यान येळ्ळूर येथील शेतकरी अनंत मुचंडी यांच्या येळ्ळूर शिवारातील बासमती भाताच्या सुक्या चाऱ्याच्या गंजीने अचानक पेट घेतल्याने जवळपास १५ ते २० हजार रुपयांचे सदरी शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्याच शेतातून ते संध्याकाळी ६ वाजता मोहरीचे भारे त्याच गंजीच्या गवताने बांधून ठेऊन घरी जाऊन पोहचले असतील तेवढ्यात गंजीला आग लागली. परिसरात दुरवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी जागेवर जाऊन शेतात ठेवलेले मोहरीचे भारेही पेटू नयेत म्हणून ते बाजूला सारले व तात्काळ शेतकऱ्याशी संपर्क साधून शेतात बोलावून घेतले. वाऱ्याच्या झोताने लगोलग संपूर्ण गंजीने पेट घेतल्याने आग आटोक्यात आणणे अशक्य होते. यामुळे या शेतकऱ्याचे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याच परिसरात दत्तात्रय पाटील यांच्या शेतातील कुपनलीकेचे नुकसान केल्याने त्यांना जवळपास लाख दडलाख खर्च आला, त्यातच महादेव कुगजी व आणखी एका शेतकऱ्याच्या शेतातील मध्यरात्री लाखभर रुपयांची फुट्टी चोरीस गेली, अनेकांची काढून ठेवलेली रब्बी पीकंही चोरीस जात आहेत अस अनेक शेतकरी सांगताहेत.
याभागातील शिवारात भर दुपारी व रात्री शेतात कोण नसत याची संधी साधून जूगार, मटण पार्टी, दारु, गांजासह इतर पदार्थ सेवन करण्यासाठी मौज करण्यासाठी येतात. कचरा तिथेच टाकून जातात आणि तोच कचरा शेतकऱ्यांनी वेल्हेवाट लावायची. शेतकरी महिलाही भितीने शेतात जाण्यास भितिच्या छायेत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती करने जिकिरीचे झाले आहे. तेंव्हा संबंधीत पोलीस खात्याने शिवारात जुगार, पार्ट्या, दारु, गांजा सेवन करणाऱ्यावर करडी नजर ठेऊन शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे, पीकांचे व इतर नुकसान थांबवावे अशी समस्त शेतकरी बंधूतर्फे मागणी आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *