बेळगाव : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. असेच एक सैतानी कृत्य बेळगावातील कुलगोड येथे घडली आहे दोन मुलांच्या बापाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्या अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याची घटना घडली असून या घटनेने महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
बेळगावातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून बसप्पा अदिवेप्पा या नराधमाने एका अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन घृणास्पद कृत्य केले. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
आरोपीला दोन मुले असून, त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला 8 महिन्यांची गर्भवती केली.
Belgaum Varta Belgaum Varta