
बेळगाव : वाढत्या उष्णतेने नागरिक त्रस्त असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी जायंट्स ग्रुपतर्फे पाणपोईची सोय करण्यात आली आहे. बुधवार पेठ येथील यश मार्केटिंग जवळ पाणपोईचे उदघाटन ज्ञानेश कामत यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील गर्दीच्या ठिकाणी पाणपोई ठेवण्यात येणार आहे. पाणपोईसाठी प्रवीण त्रिवेदी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी जायंट्स गुपचे उपाध्याक्ष तानाजी शिंदे, सेक्रेटरी शुभम नांदवडेकर, फेडरेशन सेक्रेटरी प्रवीण त्रिवेदी, सदस्य गणेश गुंडप एम गंगाधर, दीपक हवळ, श्रीधन मुळीक, प्रसन्ना रेवणन्नावर, अभिषेक वायंगडे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta