Sunday , July 26 2026
Breaking News

युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे शासकीय योजना व डिजिटल बँकिंग शिबीर

Spread the love

 

बेळगाव : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये शासकीय योजना व डिजिटल बँकिंग विषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. सतीश पाटील (माजी ग्रामपंचायत अध्यक्ष येळ्ळूर), प्रमुख वक्ते युनियन बँक ऑफ इंडियाच्या रिजनल ऑफिस बेळगावचे आर्थिक समावेशन विभागाचे प्रमुख आकाश जमोडे, वरिष्ठ शाखा प्रबंधक अभिजित सायमोते आणि परशुराम मोटराचे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमामध्ये प्रधान मंत्री जीवन ज्योती योजनेच्या 2 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रू चेक वितरण करण्यात आले..
श्रीमती मंगल होनगेकर आणि श्री. प्रवीण कुकडोळकर या लाभार्थ्यांना ही विम्याची रक्कम युनियन बँक ऑफ इंडियातर्फे देण्यात आली.

ग्रामपंचायत व बँक यांच्या सहयोगाने येळ्ळूर गावामध्ये जास्तीतजास्त लोकांपर्यंत सरकारी योजना पोहचवण्याचे काम केले जाईल असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे सतीश पाटील यांनी केले. तसेच युनियन बँक ऑफ इंडियातर्फे लोकापर्यंत सरकारी योजना पोहचवण्याच्या उपक्रमाचे कौतुकही केले.

प्रधान मंत्री जीवन ज्योती योजना, प्रधान मंत्री जीवन सुरक्षा योजना व अटल पेन्शन योजना या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन आकाश जमोडे यांनी केले. तसेच डिजिटल बँकिंगचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयीही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

बँकेच्या येळ्ळूर शाखेतर्फे चालू आर्थिक वर्षामध्ये 8 लाभार्थ्यांना प्रधान मंत्री जीवन ज्योती योजनेमधून प्रत्येकी 2 लाख रु. ची विमा रक्कम मिळवून देण्यात आली आहे, अशी माहिती शाखा प्रमुख अभिजित सायमोते यांनी दिली.

उपस्थित सर्वांनी या शासकीय योजनांचा लाभ घेऊन इतरांनाही या योजनाबद्दल मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन परशुराम मोटराचे यांनी केले.

प्रदीप पोतदार यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन उप शाखा प्रमुख दिलीप कुमार, रवी प्रकाश, चंद्रकांत हम्पन्नावर, गुरुनाथ पाटील, सिद्धार्थ पाटील, शाम कुंभार यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

Spread the love    बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *