Sunday , September 8 2024
Breaking News

बेळगावच्या स्केटिंगपटूंचे घवघवीत यश!

Spread the love

मिरज रोलर स्केटिंग असोसिएशन रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022
बेळगाव : सांगली- मिरज रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत बेळगाव स्केटिंग संघाने आठ सुवर्ण, सहा रौप्य आणि दहा कांस्य अशी एकंदर चोवीस पदके पटकाविली. सांगली येथील वालमार्ट स्केटिंग ट्रॅकवर 27 फेब्रुवारी रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
स्पीड स्केटिंग प्रकारात सौरभ एस. साळोखे यांने एक सुवर्ण, साईराज मेंडके याने एक सुवर्ण, कियारा जाधव हिने एक सुवर्ण, रायांशी महागावकर हिने एक कास्य, जयधन एस. राज याने एक कांस्य, लावण्या लोहार हिने एक कांस्य, भव्या एस. पाटील हिने एक रौप्य, अथर्व भुते याने एक कांस्य, श्री. रोकडे यांने एक रौप्य, ध्रुवा एस. पाटील हिने एक सुवर्ण, धिमंत डी. कुलकर्णी याने एक कांस्य, सत्यम पाटील याने एक कांस्य, आराध्या पी. हिने एक सुवर्ण, अवनीश कामन्नावर याने एक सुवर्ण, प्रांजल पी. पाटील हिने एक रौप्य, अर्शन झेड. माडीवाले याने एक कांस्य, जान्हवी तेंडुलकर हिने एक सुवर्ण, अनघा जोशीने एक रौप्य, कुलदीप बिर्जेने एक कांस्य, अक्षरा केंकरे हिने एक कास्य, आर्या कदम याने एक सुवर्ण, धिमंत कुलकर्णीने एक कांस्य, विहान कनगलीने एक कांस्य तसं संमेध कनगलीने एक कांस्यपदक पटकाविले.
सुयश मिळवलेले हे सर्व स्केटिंगपटू मागील चार वर्षांपासून केएलई सोसायटी संचलित लिंगराज कॉलेज स्केटिंग रिंग, गोवावेस येथील रोटरी- मनपा स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करतात. या स्केटिंगपटूंना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, बेळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, भारत पाटील, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, शुभम साखे, प्रभाकर चौगुले, अश्विनी चौगुले, यशवंत चौगुले, चिन्मय देसाई, सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *