दोन सत्रात आयोजन : अध्यक्षीय भाषण, कविसंमेलनाचा सहभाग
कुद्रेमानी : बलभीम साहित्य संघ व कुद्रेमानी ग्रामस्थ आयोजित 19 वे साहित्य मराठी संमेलन रविवार दि. 16 मार्च रोजी आयोजित केले आहे. ग्रंथदिंडी, अध्यक्षीय भाषण व कविसंमेलन होणार असून संमेलनाचे उद्घाटन काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन आर. आय. पाटील राहणार आहे.
संमेलनाध्यक्षपदी दि. बा. पाटील (कामेरी) हे राहणार आहेत. दुसर्या सत्रात कविसंमेलन होणार आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षपदी हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयतील प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार राहणार आहेत. संमेलनात कवी बसवंत शहापूरकर (कडोली), कवी संजीव वाटूपकर (माचीगड), कवी प्रा. अशोक अलगोंडी (कागवाड), कवयित्री सीमा कणबरकर (होनगा) सहभागी होणार आहेत.
संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून दिंडीला प्रारंभ होणार आहे. यामध्ये गावातील भजनी मंडळे, महिला मंडळे, युवक मंडळे, गावकरी सहभागी होणार आहेत. संमेलन कुद्रेमानी हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रमात मराठा बँक, जिजामाता महिला बँक, पीकेपीएस सोसायटी, भाग्लक्ष्मी सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta