माधूरी सावंत – भोसले; ‘मराठा संस्कृती संवर्धन’चा वर्धापन दिन उत्साहात
बेळगाव : मराठा संस्कृती संवर्धन संघटनेने संस्कृतीच्या संवर्धनासाठी आजवर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. संघटनेने आता सामाजिक आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी जनजागृतीचे कार्यही हाती घ्यावे, असे आवाहन उत्साळी (ता. चंदगड) ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच व पूणे येथील यशवंतराव विकास प्रबोधनीच्या प्रशिक्षिका सौ. माधूरी सावंत – भोसले यांनी केले. येथील मराठी संस्कृती संवर्धन संघटनेच्या ११ व्य वर्धापन दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शहापूर येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय देसाई होते. जेष्ठ संचालक बी. बी. देसाई, सचिव किशोर देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सौ. देसाई यांनी कर्करोगाचे संक्रमण, उपाय व घ्यावयाची काळजी या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. विजय देसाई यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी कसी काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती दिली.
कुमारी क्रांती विचारे हीच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. माधूरी सावंत – भोसले, बी. बी. देसाई, किशोर देसाई आदीनी दीप प्रज्वलन केल्यानंतर डॉ. विजय देसाई यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. बी. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर सौ. श्वेता देसाई यांनी पाहूण्याचा परिचय करून दिला.
समाजातील जेष्ठ नागरीक व दहावी, बारावी व पदवी परीक्षेत विशेष गुणवत्तेत उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच यावेळी घेण्यात आलेल्या नृत्य, पाककला, रांगोळी आदी स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
बापूसाहेब देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर स्नेहल देसाई यांनी आभार मानले.