बेळगाव : शेतकऱ्यांच्या जीवनातील एक घटक व जीवापाड प्रेम करतो ती त्यांची जीवनदाहिनी म्हणजे “म्हैस” पळवण्याच्या शर्यतीचे आयोजन करत असतो.
यावर्षी देखील श्री शिव शक्ती युवा संघटना यांच्या वतीने होळी निमित्य भव्य म्हैस पळविण्याची स्पर्धा अयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या रविवारी 16 मार्च रोजी ही स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार संजय पाटील व माजी जिल्हा पंचायत आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष मोहन मोरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी म. ए. समिती नेते आर. एम. चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, मथुरा तेरसे, रामचंद्र मनोळ्कर, गोविंद टक्केकर, डॉ. सोनाली सरनोबत यासह आदी नेते मंडळी उपस्थिती राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta