
बेळगाव : पुणे येथे भारताचे माजी संरक्षण व कृषी मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची मराठी मॉडेल स्कूल शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटीने रविवारी 16 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार वाजता पूणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भेट घेतली. दरम्यान 26 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उद्घाटन समारंभाला पवार साहेबांनी उद्घघाटक म्हणून येण्याची संमती दर्शवली. याप्रसंगी अभियंते अमित देसाई, शतकोत्तर कमिटीचे अध्यक्ष श्रीमान रावजी पाटील, सेक्रेटरी मुख्याध्यापक राजेंद्र कुमार चलवादी, स्मरणिका कमिटीचे अध्यक्ष श्रीमान बबन कानशिडे, निधी संकलन कमिटीचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, श्रीधर धामणेकर, सुनील हलगेकर, मुख्याध्यापक श्री. आनंद आप्पाजी पाटील, अभियंते गीतन ज्योतिबा गेंडे, अभियंते नारायण गोरे, श्रीमान किरण पाटील, संतोष कदम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta