अंकली : कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सौन्दत्ती यल्लम्मा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला असून तुकाराम कोळी (72), रुक्मिणी कोळी (62) आणि सांगली येथील कल्पना अजित कोळी (32) यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालकासह आदित्य कोळी (11), अनोज कोळी (13) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर चिक्कोडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंकली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.