
बेळगाव : महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर यांच्या वतीने राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने मराठी प्रेमींसाठी “शब्दाक्षरी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गाण्यांची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर, गाण्यांवर आधारित विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा होणार आहे.
सदर स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ऑनलाइन होणार असून अंतिम फेरी 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर येथे घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थेकडून दोन-दोन सभासदांचा एक गट धरला जाणार आहे. दोन सभासदांचे एका गटासाठी प्रवेश मूल्य 1000 रुपये राहणार असून दोन गटांसाठी ते दोन हजार रुपये राहील. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघ स्पर्धकांचा बेंगलोरला जाण्या येण्याचा तसेच राहण्याचा खर्च महाराष्ट्र मंडळाकडून दिला जाईल. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी रुपये पंधरा हजार, बारा हजार व आठ हजार असे तीन पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी दीपक कुलकर्णी यांना 9845185655 किंवा विद्या पळसुले यांना 9886301870 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta