कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये 28 फेब्रुवारी अर्थातच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रांगोळीतून विविध आकृत्या रेखाटून त्याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात दिली. त्यामुळे रांगोळीतून विज्ञानाचे धडे अवतरल्याचे प्रदर्शनात पहावयास मिळाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन कॅन्टोन्मेंटच्या महसूल अधिकारी प्रियंका पेटकर यांच्या हस्ते झाले. कार्यालयीन व्यवस्थापक एम. वाय. तालुकर, शाळेचे माजी विद्यार्थी शामलाल धनवार, प्रकाश गौंडाडकर, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे, सहशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनासाठी विज्ञान शिक्षिका एन. के. गुंजीकर, एम. एस. वडगोळ यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षक डी. ए. कुरणे, टी. एस. कांबळे, आर. डी. कांबळे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन यु. एस. पाटील यांनी केले.
वाय. एम. तालुकर यांनी शाळेच्या प्रगतीबद्धल समाधान व्यक्त केले. तर पेटकर यांनी या रांगोळी विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.