Sunday , December 14 2025
Breaking News

गुड्डादेवी मंदिराजवळ झाली पिण्याच्या पाण्याची सोय

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी येथील जागृत देवस्थान गुड्डादेवी ही जागृत देवी असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते अगसगे, चलवेनहट्टी, मण्णुर,गोजगे, बेक्कीनकरे, अतिवाड अशी पंचक्रोशीच्या सीमेवर वसलेल्या या देवीला आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी दर मंगळवार व शुक्रवार असे आठवड्यातून‌ दोन दिवस भाविक याठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात पण या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे मोठी अडचण होत होती. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ही समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी चलवेनहट्टी येथील मंदिरचे पुजारी भरमा शिवराय आलगोडी यांनी कंबर कसली त्यामुळे साहजिकच या ठिकाणी एक कुपनलिकेची गरज होती आणि विद्युत पुरवठा जोडणी आवश्यक होते. त्यासाठी एक किलो मीटर लांब असलेल्या अंतरावरून विद्युत पुरवठा करणे अपेक्षित होते आणि या कार्यासाठी जवळपास चार लाखांचा खर्च अपेक्षित होता.
एका मोठ्या दानशूर भाविकाने कुपनलिका (बोअरवेल) खुदाई करण्यासाठी नाव‌ जाहीर न‌ करण्याच्या अटीवर बोअरवेलला येणारा आर्थिक खर्च देणगी देऊन सहकार्य केले तसेच इतर भाविकांनी विद्युत पुरवठ्यासाठी सढळ हस्ते देणगी देऊन सहकार्य केल्याने भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीतून सुटका मिळाली आहे. भाविकांसह मंदिर परिसरातील शेतकऱ्यांची सुध्दा पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली. त्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे‌. कोणतेही सरकारी अनुदान नसताना देणगीच्या माध्यमातून हे कार्य पुर्ण केल्याने पुजारी भरमा शिवराय आलगोंडी यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

About Belgaum Varta

Check Also

अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवारी सुवर्णसौध नजीक धरणे आंदोलन

Spread the love  बेळगाव : अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौधध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *