बेळगाव : मैत्रेयी कलामंचचा पाचव्या वर्धापन दिनी महिला विद्यालय हायस्कूल सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ लेखिका, दिग्दर्शिका नीता कुलकर्णी या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी अपंग जोडीदाराची स्वखुशीने निवड करुन जिद्दीने संसार करणारी कर्तृत्ववान महिला मनाली कुगजी तसेच धुणीभांडी, काबाडकष्ट करून आपल्या मुलांना स्वावलंबी बनविणारी सामर्थ्यशील महिला इंदुबाई कडु यांना सन्मानार्थी बोलाविण्यात आले होते. या महिलांना सन्मानित करण्यासाठी सौ. स्मिता किल्लेकर यांनी आपली आई कै.कमल माळवी यांच्या स्मरणार्थ आर्थिक स्वरूपात मदत करून या महिलांना सन्मानित केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.मनिषा नाडगौडा यांनी सर्वांचे स्वागत करुन स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक सौ. अपर्णा पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. अक्षता पिळणकर यांनी केला. सत्कारमूर्ती सौ. मनाली कुगजी यांचा परिचय प्रतिभा सडेकर तर दुसऱ्या सत्कारमूर्ती इंदुबाई कडु यांचा परिचय सौ. मनिषा मोरे यांनी केला. प्रमुख पाहुण्या मा. नीता कुलकर्णी यांचा सन्मान सौ.रोशनी हुंद्रे यांनी केला. दोन्ही सत्कारमूर्तींचा सन्मान सौ. स्मिता किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुण्या नीता कुलकर्णी यांनी मार्गदर्शकपर भाषण केले. या कार्यक्रमात मैत्रेयी कलामंच मंडळाच्या मैत्रिणींच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. प्रा मनिषा नाडगौडा, सौ. अक्षता यळ्ळूरकर,सौ. स्नेहल बर्डे, सौ. अक्षता पिळणकर, सौ.रोशनी हुंद्रे, ईशानी जाधव यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मैत्रेयी कलामंचच्या सर्व महिलांचा सन्मान नीता कुलकर्णी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघा भंडारी यांनी केले. शेवटी सौ.अस्मिता आळतेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.