बेळगाव : न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी हा परिसर सध्या कचऱ्याचा अड्डा बनला आहे. या भागात असलेल्या खुल्या जागेत स्थानिक रहिवाशी व दुचाकीस्वार कचरा टाकतात त्यामुळे न्यू शिवाजी कॉलनी येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. सदर ठिकाणी कचरा, शिळे अन्नपदार्थ, प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचरा रस्त्यावर फेकला गेल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसराचे सौंदर्य बिघडण्याबरोबरच या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यातच या कचऱ्यात टाकलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा संचार वाढला आहे. येथील नागरिकांच्या तसेच लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी या समस्येकडे लक्ष घालून तात्काळ कचरा उचल करावी व हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथील नागरिक करीत आहेत.