बेळगाव : एमबीएची पदवी पूर्ण करून कंपनीत प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणीने बेळगाव येथील पीजीमध्ये ऐश्वर्या नामक तरूणीने आत्महत्या केली आहे. विजयपूर येथील एक युवती एमबीए झाल्यानंतर कामानिमित्त बेळगावात रहायला आली आणि नेहरू नगर येथील पीजीमध्ये राहत होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती एका कंपनीत प्रशिक्षण घेत होती. मात्र अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणी आपल्या मित्राशी बोलत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. बराच उशीर दरवाजा न उघडल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
तरुणीच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बेळगाव एपीएमसी स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.