बेळगाव : बसवन कुडची येथे सुरू असलेल्या यात्रेनिमित्त अंबिलगाडा मिरवणुकीवेळी गाडीच्या चाकाखाली सापडून गंभीर युवक गंभीर झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पारीश पाटील (वय 27, राहणार बसवन कुडची) असे त्या तरुणाचे नाव आहे.
बेळगाव शहारापासून जवळच असलेल्या बसवन कुडची यात्रेनिमित्त काढल्या गेलेल्या आंबिलगाडा मिरवणुकीवेळी पारीश पाटील गाडीच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग झाला नाही. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. माळमारुती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.