Thursday , December 11 2025
Breaking News

उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेची विशेष रेल्वे सेवा

Spread the love

 

बेळगाव : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी रेल्वे बोर्डाने नैऋत्य रेल्वेला विशेष रेल्वे गाड्या चालवण्यास मान्यता दिली. उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1) रेल्वे क्र. 06281/06282 म्हैसूर -अजमेर एक्सप्रेस उन्हाळी विशेष रेल्वे (11 फेऱ्या) :
रेल्वे क्र. 06281 म्हैसूरहून एप्रिलमध्ये दि. 05,12,19,26 रोजी, मे मध्ये दि. 3,10,17,24, 31 रोजी आणि जून मध्ये दि. 7,14 रोजी थोडक्यात दर शनिवारी सकाळी 8:00 वाजता निघेल आणि सोमवारी सकाळी 06:55 वाजता अजमेरला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात रेल्वे क्र. 06282 अजमेरहून दर सोमवारी एप्रिल मध्ये दि. 7,14,21,28 रोजी, मे मध्ये दि. 5,12,19,26 रोजी आणि जून मध्ये 2,9,16 -2025 रोजी संध्याकाळी 06:50 वाजता सुटेल आणि बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता म्हैसूरला पोहोचेल.

दोन्ही दिशांना ही रेल्वे हासन, अर्सिकेरे, बिरूर, चिकजाजूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, बेळ्ळारी कँट, होस्पेट जंक्शन, कोप्पळ, गदग, एसएसएस हुबळी, धारवाड, लोंढा, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, सांगली, पुणे, लोणावळा, कल्याण,

वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौड़गड, भिलवाडा, बिजाईनगर, नशिराबाद या रेल्वे स्थानकांवर थांबेल. सदर रेल्वेला 20 कोच (डबे) असतील, ज्यामध्ये 14 एसी, 3-टायर कोच, 4 जनरल सेकंड क्लास आणि दिव्यांगांसाठी 2 सेकंड क्लास लगेज कम गार्ड कोच असतील.

2) रेल्वे क्र. 06557/06558 एसएमव्हीटी बेंगलोर -भगत की-कोठी -एसएमव्हीटी बेंगलोर उन्हाळी विशेष रेल्वे (8 फेऱ्या): रेल्वे क्रमांक 06557 एप्रिल मध्ये दि. 5,12,19,26 रोजी मे मध्ये 3,10,17, 24 रोजी म्हणजे दर शनिवारी संध्याकाळी 07:00 वाजता एसएमव्हीटी बेंगलोरहून निघेल आणि सोमवारी दुपारी 1:40 वाजता भगत की-कोठीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्र. 06558 एप्रिल मध्ये दि. 7,14,21,28 रोजी आणि मे मध्ये दि. 15,12,19,26 – 2025 रोजी म्हणजे दर सोमवारी रात्री 11:10 वाजता भगत की-कोठीहून निघेल आणि बुधवारी दुपारी 03:30 वाजता एसएमव्हीटी बेंगलोरला पोहोचेल.

दोन्ही दिशांना सदर रेल्वेला तुमकुरू, अर्सिकेरे, बिरूर, दावणगेरे, हावेरी, एसएसएस हुबळी, धारवाड, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, कुडची, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, साबरमती, महेसाणा, भिलडी, राणीवरा, मारवाड भीनमाळ, मोदरण, जालोर, मोकलसर, समधारी जं, लुनी जं. या रेल्वे स्थानकांवर थांबे असतील. या रेल्वेला 21 कोच (डबे) असतील, ज्यात 19 एसी आणि अपंगांसाठी 2 द्वितीय श्रेणी लगेज कम गार्ड कोच यांचा समावेश असेल.

About Belgaum Varta

Check Also

मच्छे शाळा सुधारणा कमिटी अध्यक्षपदी गजानन छप्रे

Spread the love  मच्छे : गावातील सरकारी मॉडेल प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे शाळा सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *