
बेळगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा गावाजवळ ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकल्याने ऑटो चालकाचा मृत्यू काल दि. ३ रोजी रात्री झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
न्यू गांधीनगर येथील 45 वर्षीय मम्मदल्ली शब्बीरअहमद भारगीर असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. धामणे गावातील सासूच्या घरी जेवण करून घरी परतत असताना ही दुर्घटना घटना घडली. हिरेबागेवाडी पीएसआय अविनाश येरगोप्प यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
Belgaum Varta Belgaum Varta