बेळगाव : टिळकवाडी वीर सौध योगा केंद्रातर्फे श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी श्रीराम प्रतिमेचे विधिवत मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
योगा प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
रामायणचा विचार करताना, त्यांच्या जीवनात चढ उतार, भावनिक हेलकावे, सामर्थ्यवान म्हणून देवत्व पावलेला राम सामान्य माणसाला जवळचा वाटतो.एकपत्नीव्रताचा आदर्श घालून दिला, हा सामाजिक बदल निश्चितच महत्त्वाचा होता.
वनवासातील कठीण काळातही साथ देणारी सीता आहे.
श्री प्रभू रामचंद्र भविष्यातही आचार विचार अंगिकारले पाहिजेत आदर्श राजा म्हणून मनात रुजलेला विचार महत्त्वाचा आहे असे यावेळी मनोगत व्यक्त करताना मौलिक विचार मांडले.
रामरक्षा, अग्नीहोत्र झाल्यानंतर एक हजार आठ वेळा श्री राम जय राम जय जय राम हा मंत्र सामुहिक म्हणताना वातावरण प्रसन्न आंनदी समाधान झाले.
यावेळी वासुदेव इनामदार, सौ.उषा दळवी, प्रसाद पंडित यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीपाद खानोलकर, निमाई पाटील, अनंत सावंत, प्रभाकर कामत, उमेश सुपाले, शामल पाटील, दीपा चौगुले, शोभा दुर्वे, गीता देशपांडे, रेश्मा आजगावकर, सर्व पदाधिकारी उपस्थित होते
सूत्रसंचालन दत्तात्रय कुरविनकोप यांनी केले आभार वाय. पी. नाईक यांनी मानले.