
अथणी : पंचमसाली समाजासाठी स्वामीजींनी आंदोलन करावे. वैयक्तिक राजकारणासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्यासाठी आंदोलन करू नये हे चुकीचे आहे, असे कर्नाटक राज्य वायव्य परिवहन महामंडळ अध्यक्ष आमदार राजू कागे यांनी स्पष्ट खुलासा केला.
खिळेगाव बसवेश्वर देवस्थान ते शिरूर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. पंचमसाली समाजात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. आम्ही सर्व एक आहोत परंतु पंचमसाली समाजाच्या स्वामीजींनी एका पक्षाच्या नेत्यासाठी पक्षातून बाहेर काढल्यानंतर आंदोलन करणे हे पूर्ण चुकीचे आहे असे सांगून ते म्हणाले यत्नाळ काँग्रेस पक्षामध्ये येणार नाहीत जर पक्षाच्या वरिष्ठांनी मला आदेश केल्यास मी त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करू हे मात्र निश्चित.
भाजप देशात एक शिस्तबद्ध पक्ष आहे परंतु अलीकडे पक्षांमध्ये फूट पडल्याने कर्नाटक राज्यात दोन गट झाले आहेत त्यामुळे पक्ष अधोगतीला जात आहे .शिस्तबद्ध व्यवस्था भाजपमध्ये राहिले नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
खिळेगाव ते शिरूर रस्ता डांबरीकरण चार कोटीचा असून रस्ता चांगल्या दर्जाचा करावे. निगडित अवधीमध्ये काम पूर्ण करून द्यावे. भाविकांना जाण्या-येण्यासाठी सोईचे होणार आहे. कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये सीमाभागातील महाराष्ट्रास जोडणारे रस्ते पूर्ण डांबरीकरण झाले असेल कोणताही रस्ता कच्चा नाही. राज्यांमध्ये एक आदर्श मतदारसंघ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पीकेपीएस अध्यक्ष संजय उंबरे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सतीश होन्हागोळ, विशाल निंबाळ, मुख्य अभियंता दयानंद हिरेमठ, अभियंता मलिकार्जुन मगदूम, कॉन्ट्रॅक्टर इमानसाब बिरादार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta