Wednesday , March 4 2026
Breaking News

पांगुळ गल्लीतील अश्वथामा मंदिरावर पुन्हा “त्याच” युवकाकडून दगडफेक

Spread the love

 

बेळगाव : पांगुळ गल्ली येथील अश्वथामा मंदिरावर पुन्हा दगडफेक केल्याची घटना सोमवारी घडली.

मागील 19 मार्च रोजी उज्वल नगर येथील रहिवासी असलेल्या यासिरने मंदिरावर दगडफेक केली होती. दगडफेकीनंतर तेथील स्थानिकांनी तरूणाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी तक्रार नोंदवून त्याला तुरुंगात पाठवले होते. कारागृहातून मानसिक रुग्णालयात दाखल झालेल्या यासिरची काल रुग्णालयातून सुटका झाली आणि त्याने मंदिरावर पुन्हा दगडफेक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी त्याला मारहाण केली आणि पुन्हा त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

दगडफेकीनंतर काहीकाळ परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त चोख बंदोबस्त ठेवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *