Wednesday , March 4 2026
Breaking News

आत्महत्या करायला गेला पण दोन्ही पायच गमावून बसला!

Spread the love

 

गोकाक : गोकाकमध्ये एक युवक आत्महत्या करण्यासाठी गेला पण त्याला दोन्ही पाय गमवावे लागले. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक रोड रेल्वे स्थानकाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
शिंदीकुरबेट गावचा होळेप्पा हुलकुंद नावाच्या युवकाने रेल्वे रुळावर स्वतःला झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो वाचला, मात्र त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. स्थानकावरील संबंधित अधिकारी त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्याऐवजी मोबाईलमध्ये चौकशी करण्यात गुंतले होते, यामुळे नजिक उभ्या प्रवाशातून नाराजी व्यक्त होत होती. होळेप्पा या युवकाने आपली दुचाकी रेल्वे स्थानकात पार्क केली आणि थेट रुळांवर स्वतःला झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी रेल्वे आल्यामुळे त्याचे दोन्ही पाय कापले गेले. या दुर्घटनेनंतर युवक थोडाफार शुद्धीत होता. मात्र त्याला रुग्णालयात दाखल न करता अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू ठेवली होती.
यामुळे अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले जात असून, सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *