
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील इंचळ गावातील एका नवविवाहित महिलेने कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र उपचाराविना सदर महिलेचा शुक्रवारी बिम्समध्ये मृत्यू झाला.
लक्ष्मी मंजुनाथ हुगार (22) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मीचा विवाह तिच्या मामाचा मुलगा मंजुनाथ याच्याशी डिसेंबरमध्ये झाला. लग्नानंतर पाच महिन्यांतच नवविवाहितेने आत्महत्या केल्याने संशय व्यक्त होत आहे.
कीटकनाशकाच्या गोळ्या खाल्ल्याने लक्ष्मीला तिच्या कुटुंबीयांनी प्रथम बैलहोंगल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लक्ष्मीला तात्काळ बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. मात्र, बेळगावच्या बिम्स रुग्णालयात उपचार न मिळाल्याने लक्ष्मीचा मृत्यू झाला. लक्ष्मीच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. कुटुंबीयांनी मीडियाला सांगितले की, लक्ष्मीला वारंवार प्रकृतीचा त्रास होत होता. लक्ष्मीचे लग्न मोठ्या कष्टाने केले होते. घरी कोणी नसताना सदर कृत्य केल्याची माहिती त्यांनी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात पाठवण्यात आला आहे. ही घटना बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta