बेळगाव : बेळगावमधील एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाने डेथ नोट लिहून आत्महत्या केली. ओंकार पवार (25) असे मृताचे नाव आहे. तो बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होता. पगार मिळत नसल्याने कंटाळून त्याने आत्महत्या केली.
मागील चार महिन्यांपासून पगार न देता रुग्णालय मला त्रास देत होते. अनेक वेळा विनंती करूनही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे नाराज झालेल्या ओंकारने डेथ नोट लिहून भाड्याच्या घरात गळफास लावून घेतला. दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या ओंकारला एक लहान मूलही आहे.
कुटुंबीय आणि रुग्णवाहिका चालक संघटनेने रुग्णालयाविरोधात रोष व्यक्त केला आहे.