बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. 15 रोजी सायंकाळी 5.30 वाजता रामलिंगखिड गल्ली येथील जत्तीमठ येथे बोलाविण्यात आली आहे.
या बैठकीस शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शिवभक्त, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी व चिटणीस विजय पाटील यांनी केले आहे.