
बेळगाव (प्रतिनिधी) : अथणी तालुक्यातील कोडगानूर या गावात एका वृद्ध महिलेसह तिच्या मुलाची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकण्यात आला.

सदर घटनेमुळे अथणी तालुक्यात खळबळ माजली आहे. मृतांची ओळख पटली असून गावातील चंद्रव्वा अप्पाराय इचेरी (६२) आणि विठ्ठल अप्पाराय इचेरी (४२) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही स्वतःच्या जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करत होते, पण मध्यरात्री गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर त्या दोघांचेही मृतदेह उसाच्या शेतामध्ये फेकून गुन्हेगार फरारी झाली. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण गाव अजूनही हादरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta