बेळगाव : जिंदालहून मिरजकडे जाणाऱ्या मालगाडीच्या दोन डबे बेळगावातील मिलिटरी महादेव देवस्थानजवळ रेल्वे रुळावरून उतरल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बेळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म बदलत असताना जिंदाल ते मिरजेला जाणारी लोहखनिज गाडी रुळावरून घसरली. रेल्वेच्या डब्यांमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन दुरुस्ती केली. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे अधिकारी तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta