बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला झालेल्या अपघातप्रकरणी कारला धडक देऊन पळून गेलेल्या ट्रक चालकाला जेरबंद करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे.
मधुकर कोंडीराम सोमवंशी (६५) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. कारचालक शिवप्रसाद जी. तक्रारीवरून ट्रक चालकास अटक करून ट्रक जप्त करण्यात आला आहे.
मंत्री लक्ष्मी आर. हेब्बाळकर हे त्यांचे भाऊ विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि त्यांचे अंगरक्षक इराप्पा कल्लाप्पा हुनशीकट्टी यांच्यासह बेंगळुरूहून बेळगावला येत असताना कित्तूरजवळील अंबडगट्टी क्रॉसजवळ ट्रक चालकाने कारच्या उजव्या बाजूला धडक दिल्याने अपघात झाला. कारवरील ताबा सुटून कार सर्व्हिस रोडच्या खाली जाऊन झाडावर आदळली, त्यात आतील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक न थांबवता पळून गेला असता कायदेशीर कारवाईची मागणी करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी आणि अपघातास कारणीभूत वाहनाची ओळख पटवली आहे. अपघाताच्या वेळी, धारवाड-बेळगाव एनएच ४८ महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर हिरेबागेवाडी टोल नाका आणि अंबडगट्टी परिसरातील हरियाणा ढाब्यावर बसवलेल्या सीसीद्वारे निरीक्षण केले जात होते. संकलित कॅमेरा फुटेज आणि ठोस पुराव्याच्या आधारे ट्रक क्र. एमएच-१२/टीव्ही-९७४० आणि चालक मधुकर कोंडीराम सोमवंशी (६५) यांना अपघात घडवून आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी महाराष्ट्रातील पमणी जिल्ह्यातील आहे.
Belgaum Varta Belgaum Varta