बेळगाव : साधना क्रीडा संघातर्फे बेळगामध्ये प्रथमच विश्वचषकाच्या धर्तीवर राज्यस्तरीय निमंत्रितांच्या मॅटवरील फ्लडलाईट खो-खो स्पर्धेचे आयोजन १८ व २० एप्रिल रोजी वडगावमधील कन्नड मुलांची शाळा नं. १४ (जैल शाळा) येथे आज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
साधना क्रीडा संघ ही संघटना १९६८ पासून खोखो क्षेत्रात कार्यरत आहे. स्पर्धासाठी संघ तयार करणे, स्पर्धेत सहभागी होणे, विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन करत संघाने कार्य सुरु ठेवले आहे. संघाचे खेळाडू जिल्हा, विद्यापीठ आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामधून चमकले आहेत. अलीकडच्या काळात या खेळाची पिछेहाट झाल्याचे दिसते. आता सरकारच्या नव्या धोरणामुळे खोखोमध्ये नवनवे तंत्रज्ञान येत असून या खेळालाही चालना मिळत आहे, असे अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी सांगितले.
कर्नाटकातील दर्जेदार अव्वल संघांचा खेळ दाखवण्याचा आमचा उद्देश आहे. या स्पर्धा पाहून निश्चितपणे नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल व नवे तंत्र पाहण्याची संधी मिळेल, असे सचिव सतीश बाचीकर सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta