बेळगाव : बेळगावातील मजगाव परिसरात पार्टीसाठी मेंढ्या देण्यास नकार दिल्याने तिघा मेंढपाळांवर सात जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पार्टीसाठी मेंढ्या देण्यास नकार दिल्याने तिघा मेंढपाळांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बेळगावातील मजगाव येथे घडली आहे.
काल बेळगावातील मजगावच्या बाहेरील एका शेतात मेंढ्या चारत असलेल्या तिघा मेंढपाळांकडे सात जणांची टोळी आली. त्यांनी पार्टीसाठी मेंढ्या मागितल्या. मात्र मेंढ्या देण्यास नकार दिल्यानंतर या सातही जणांनी तिघा मेंढपाळांवर अचानक हल्ला चढवला आणि घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात आनंद कल्लोळर, यल्लप्पा कल्लोळर आणि गंगाराम बेळगावकर या तिघांना डोळे, पोट, डोके आणि हात यांसह अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींवर बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बेळगावच्या उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta