बेळगाव : कर्नाटक राज्य भारतीय कृषिक समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी समाजाच्या राज्याध्यक्षांनी संघटनेच्या विस्तारासंबंधी माहिती दिली.
बेळगावमध्ये शुक्रवारी कर्नाटक राज्य भारतीय कृषिक समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाजाचे राज्याध्यक्ष सिद्दगौड मोदगी यांनी सांगितले की, समाजाने कर्नाटकातील सात जिल्ह्यांतील अध्यक्षांची निवड करून राज्यस्तरीय पूर्ण समिती स्थापन केली आहे. या समितीची निवड पूर्णतः विधीमान्य पद्धतीने करण्यात आली असून, पदग्रहण सोहळ्याद्वारे संबंधितांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
राज्य, जिल्हा, तालुका व ग्राम पातळीवर संघटना विस्तार करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांच्या तक्रारी व अडचणी शासनापर्यंत पोहोचवून उपाययोजना करणे, अशा विविध उद्दिष्टांसाठी ही संघटना कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब उदगट्टी, रामनगौड भरमगौडर, सचिव सी. कुमारस्वामी, बी. व्ही. कृष्णमूर्ती, हावेरी जिल्हाध्यक्ष शिवानंद करिगार, धारवाड जिल्हाध्यक्ष जगदीश कोंडिकोप्प, बेळगाव जिल्हाध्यक्षा गीता धरेंन्णावर, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष रामनगौड पाटील, राज्य समितीचे संचालक बसनगौड मेलिनमण्णी आदींनी पदभार स्वीकारला.
या सोहळ्याला कृषिक समाजाचे पदाधिकारी व अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta