Saturday , March 7 2026
Breaking News

पोलिओ लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

Spread the love

 

अथणी तालुक्याच्या भरमणकुडी गावातील घटना

अथणी : बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील भरमणकुडी गावात आज शुक्रवारी एक दु:खद घटना घडली. पोलिओ लसीकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. अण्णाप्पा दुंडप्पा बेवनूर असे मृत बालकाचे नाव आहे.

सदर दोन महिन्यांच्या बालकाला पोलिओ लस आणि तीन इंजेक्शन दिल्यानंतर २० तासांनी त्याचा मृत्यू झाला. याबाबत बालकाचे वडील दुंडप्पा बेवनूर यांनी इंजेक्शन दिलेल्याच नर्सच्या निष्काळजीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

प्रत्येक महिन्याला गावात लसीकरण मोहीम राबवली जाते. बाळाच्या आईने नर्सला बाळाला हृदयविकाराचा त्रास आहे हे आधीच सांगितले होते. मात्र, नर्सने “काही होणार नाही” असे सांगून तीन इंजेक्शन दिले. लसीकरणानंतर काही वेळातच बाळाला त्रास सुरू झाला आणि २० तासांनंतर बाळाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अथणी पोलिस स्थानकात संबंधित नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत बाळाचे शव बिम्स रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *